📰 ताज्या बातम्या

आर्थिक गुन्हा

नाना पेठेत रक्तरंजित सूड!

वनराज आंदेकरच्या हत्येच्या बदल्यात कोमकर घराण्याचा वारस आयुष कोमकर गोळ्या झाडून खून; बंडू आंदेकर टोळीवर मकोका कारवाई .

आर्थिक गुन्हा

पुणे मेट्रो लाईन ३ : ‘नारीशक्ती’च्या हातात नियंत्रण

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर सर्व गाड्या चालवणार महिला पायलट्स .

आर्थिक गुन्हा

नवरात्रीपूर्वी पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई

एका दिवसात ४३ जणांना तुरुंगात; हिंसाचार रोखण्यासाठी कडक उपाययोजना --- गणेशोत्सवातील हत्येनंतर सतर्कता गणेशोत्सवादरम्यान झालेल्या टोळीयुद्धातून आयुष कोमकर या तरुणाची हत्या झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवात कुठलाही हिंसक प्रकार घडू नये म्हणून पुणे पोलिसांनी कडक खबरदारीचे पाऊल उचलले आहे. े.

आर्थिक गुन्हा

एकविरा देवी यात्रेसाठी वाहतुकीत बदल

२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश --- भाविकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियोजन पुण्याच्या कार्ला येथील एकविरा देवी मंदिरात यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरळीत, सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विशेष वाहतूक बदलाचे आदेश जारी केले आहेत. --- .

आर्थिक गुन्हा

पुणे विमानतळावर ड्रग्जचा मोठा सापळा

सव्वा ५ किलो मेथाकॅलोन जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २.६१ कोटी --- आंतरराष्ट्रीय तस्करीवर आघात पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाई करत सव्वा ५ किलो मेथाकॅलोन जप्त केला आहे. जप्त झालेल्या या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे २ कोटी ६१ लाख रुपये इतकी आहे. हा पदार्थ ‘मॅथा केलॉन’ नावाच्या प्रकारात येतो आणि परदेशातून पुण्यामध्ये आणला जात होता. .

आर्थिक गुन्हा

पुण्याची हरितदूत काळाच्या पडद्याआड

पुण्याच्या शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील एक थोर व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने (वय ८५) यांचे निधन झाले आहे. ‘विजेविना जीवन जगणाऱ्या आजी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. साने यांनी आपले संपूर्ण आयुष्य निसर्गाशी एकरूप होत जगण्यात घालवले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

IPL match

पुण्यात वाढत्या गुन्ह्यांवर पोलिसांची कडक नजर

पुण्यातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि स्थलांतरितांचा ओघ यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. विशेषतः उपनगरांमध्ये चोऱ्या, घरफोड्या आणि रस्त्यावरचे गुन्हे (‘स्ट्रीट क्राइम’) झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Traffic Pune

पुण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, रस्ते जलमय – पुढील ४८ तास यलो अलर्ट

पुणे | प्रतिनिधी गुरुवारी (दि. १८) दुपारनंतर पुणे शहर आणि उपनगरात विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट करीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. दीड ते दोन तास झालेल्या धो-धो पावसाने कोथरूड, औंध, पाषाण, वारजे, बाणेर, धायरी, कात्रज, कळस आणि धानोरी परिसर अक्षरशः जलमय झाला.

आर्थिक गुन्हा

लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई – पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

पुणे | प्रतिनिधी हातभट्टीची दारु विक्री, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, धमकावणे आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केले आहे. या कारवाईची माहिती परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.

IPL match

वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्याचे आयुक्तांचे आदेश

पुण्यातील वाहतूककोंडीमुळे नागरिकांचे हाल होत असल्याने महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी शहरातील प्रमुख ३२ रस्ते आणि २२ चौकांमधील वाहतूककोंडीची कारणे शोधून सोमवार (दि. २२) पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Traffic Pune

आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची तयारी

जानेवारीत होणाऱ्या जागतिक सायकल स्पर्धेसाठी मार्गावरील रस्त्यांचे डांबरीकरण व सुशोभीकरणावर १४५ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. मात्र, त्याचसोबत शहरातील इतर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Rain Pune

अतिक्रमणांवर कारवाई तीव्र

महापालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा मोर्चा उघडला आहे. भर पावसात गुरुवारी औंध-बाणेर व धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मोठी मोहीम राबवण्यात आली. तसेच ढोले-पाटील, कोथरूड-बावधन, वारजे-कर्वेनगर, कोंढवा-येवलेवाडी आणि बिबवेवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांत अतिक्रमणे व बांधकामे पाडण्यात आली.

Politics Pune

लोककला केंद्रांमध्ये डीजे आणि अश्लील नृत्यामुळे कलावंतांची बदनामी

महाराष्ट्रात जवळपास ८० लोककला केंद्रे कार्यरत आहेत. मात्र, त्यापैकी निम्म्या केंद्रांमध्ये पारंपरिक वाद्यांऐवजी डीजेच्या वापरातून अश्लील नृत्याला प्रोत्साहन दिले जात आहे, तसेच काही ठिकाणी विविध गैरप्रकारही सुरू असल्याचे उघड झाले आहे.

Rain Pune

राष्ट्रीय लोकअदालतीत महावितरणची १,०५७ प्रकरणे निकाली; २ कोटी १८ लाखांची वसुली

महावितरणकडून थकबाकीदार ग्राहकांकडून वीजबिल वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत १,०५७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधून तब्बल २ कोटी १८ लाख रुपयांची वसुली झाली आहे.

ताज्या बातम्या & अपडेट्स

पुणे • IPL • वित्त • राजकारण • तंत्रज्ञान

पुणे मेट्रो
अहिल्यानगर रेल्वे विस्तार
पुणे : महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार ऐतिहासिक अहमदनगर शहराचे अधिकृत नामांतर "अहिल्यानगर" करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेनुसार, आता "अहमदनगर" या नावाने ओळखले जाणारे स्थानक अधिकृतरीत्या "अहिल्यानगर" या नावाने ओळखले जाईल. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार व सर्वेयर जनरल ऑफ इंडिया यांच्या पत्रानुसार स्थानकाचे नाव पुढीलप्रमाणे लिहिणे बंधनकारक असेल.देवनागरी (मराठी): अहिल्यानगर देवनागरी (हिंदी): अहिल्यानगर रोमन (इंग्रजी): AHILYANAGAR स्थानकाच्या कोडमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणेच ANG हाच कोड कायम राहणार आहे. अहमलनेर(बी) – अहिल्यानगर दरम्यानची रेल्वे सेवा सुरू असून, या मार्गावर प्रवास करणे नागरिकांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. दरम्यान, बीड – अहमलनेर(बी) या नवीन रेल्वेमार्गाचे उद्घाटन होणार असून, बीड – अहिल्यानगर दरम्यानची पहिली उद्घाटन विशेष गाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते १७ सप्टेंबर रोजी रवाना होणार आहे. या विभागात बीड, राजुरी(नवगण), राईमोहा, विघनवाडी, जतनंदूर व अहमलनेर(बी) अशी एकूण सहा स्थानके आहेत. स्थानिक प्रवाशांनी व सर्वसामान्य नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे.
स्मार्ट सिटी पुणे
अहिल्याबाई होळकर : प्रज्ञा, पराक्रम व प्रशासनकौशल्याचा अद्वितीय संगम
संस्कृती व पर्यटन मंत्रालयानुसार, राजमाता अहिल्याबाई होळकर या १८व्या शतकातील मालवा साम्राज्याच्या द्रष्ट्या महाराणी होत्या. धर्मसंवर्धन, उद्योगप्रसार व सामाजिक उपक्रम यांत त्यांचे कार्य आजही आदर्श मानले जाते. त्यांचे प्रज्ञावान व धाडसी व्यक्तिमत्त्व भारतीय इतिहासातील सुवर्णपान आहे. ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंदी गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मांकोजीराव शिंदे हे गावचे पाटील होते. लहानपणापासून वाचन-लेखन शिकवून मुलीला सक्षम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. साधेपणा, शौर्य व दृढनिश्चय या गुणांमुळेच त्यांची छाप मल्हारराव होळकर यांच्यावर पडली. १७३३ मध्ये मल्हाररावांनी आपल्या सुपुत्रा खंडेराव होळकरांशी अहिल्याबाईंचा विवाह लावून दिला आणि पुढे भारतीय इतिहासाने एक अद्वितीय अध्याय पाहिला. अहिल्याबाईंच्या अद्वितीय कार्याला व त्यांच्या नावाला न्याय देण्यासाठीच आज अहमदनगर जिल्ह्याला "अहिल्यानगर" हे नवे नामाभिधान मिळाले आहे.
वाहतूक पुणे
बुधवार पेठेत पैशाच्या वादातून तरुणाची बेदम धुलाई; वेश्याव्यवसायातील तिघींवर गुन्हा दाखल
पुणे : पुणे शहरातील बुधवार पेठ परिसर हा नेहमीच विविध गुन्हेगारी आणि सामाजिक घटनांमुळे चर्चेत असतो. शुक्रवारी रात्री या परिसरातील लालबत्ती भागात घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. वेश्याव्यवसायातील तिघींनी एका ३९ वर्षीय तरुणाला पैशांच्या वादातून बेदम मारहाण केली असून, या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना १२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी तरुण बुधवार पेठेतील एका इमारतीत गेला. तिथे त्याची ओळख तमन्ना शाहरुख मुलाना (३२) हिच्याशी झाली. त्यांच्यात पैशाचा व्यवहार ठरल्याप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने करण्याचे ठरले होते. मात्र, तरुणाला पेमेंट अॅपचा पासवर्ड लक्षात न आल्याने रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यावरून तरुण व तमन्नामध्ये वाद झाला. वाद चिघळताच तमन्नाने तरुणाला शिवीगाळ करत संताप व्यक्त केला. “पैसा नाही तर इकडे कशाला आलास?” अशा शब्दांत तिने तरुणावर तुटून पडली. यानंतर घटनास्थळी तनुजा हकीमअली मौल्ला (३४) आणि सोनिया गुलाम शेख (३२) या दोघीही आल्या. तिघींनी मिळून त्या तरुणाला धक्काबुक्की केली आणि चोप दिला. मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरून फरासखाना पोलिसांनी तिन्ही महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या वादामुळे ही घटना घडली. आरोपी महिलांवर संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे बुधवार पेठ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वेश्याव्यवसायामुळे कायम वादग्रस्त ठरलेल्या या भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून या परिसरातील अवैध कृत्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
शिक्षण पुणे
पश्चिम महाराष्ट्रात विजांसह वादळाचा इशारा; हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’
पुणे : आज, १७ सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील २४ ते ४८ तास नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे जिल्हा गेल्या २४ तासांत पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर भागात ४.७ मिमी पावसाची नोंद झाली. या काळात कमाल तापमान २५.३ अंश सेल्सिअस होते. आज पुणे जिल्ह्यात आकाश ढगाळ राहणार असून, विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. सातारा जिल्हा मंगळवारी सातारा जिल्हा पावसासाठी खुला राहिला. पुढील २४ तासांत साताऱ्यात कमाल तापमान २६.९ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आहे. हवामान विभागाने बुधवारी सातारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला असून, या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १.३ मिमी पावसाची नोंद झाली. या काळात कमाल तापमान २५.७ अंश सेल्सिअस होते. आज कोल्हापूर जिल्ह्यात तापमान २८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून, हवामान विभागाने एक-दोन वादळांची शक्यता व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५ मिमी पावसाची नोंद झाली. मंगळवारी तापमान २९.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील २४ तासांत सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअस राहील. या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३.२ मिमी पावसाची नोंद झाली. या काळात कमाल तापमान २६.७ अंश सेल्सिअस होते. आज, बुधवारी सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यात सतर्कतेचे आवाहन राज्यात पावसाळी वातावरण कायम आहे. पुढील ४८ तासांत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. राज्याच्या बहुतेक भागात वादळासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे विजांचा कडकडाट व वादळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ताज्या बातम्या & अपडेट्स

पुणे • IPL • वित्त • राजकारण • तंत्रज्ञान

IPL बातम्या

पुण्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बस

वित्त बातम्या

Pune Crime News | ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा: २,४७० कोटींच्या फसवणुकीत फरारी संचालक अर्चना कुटे पुण्यात अटक

वित्त बातम्या

वित्त बाजार

वित्त बातम्या

वित्त बाजार