अहिल्यानगर रेल्वे विस्तार
पुणे : महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार ऐतिहासिक अहमदनगर शहराचे अधिकृत नामांतर "अहिल्यानगर" करण्यात आले आहे.
भारतीय रेल्वेनुसार, आता "अहमदनगर" या नावाने ओळखले जाणारे स्थानक अधिकृतरीत्या "अहिल्यानगर" या नावाने ओळखले जाईल. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार व सर्वेयर जनरल ऑफ इंडिया यांच्या पत्रानुसार स्थानकाचे नाव पुढीलप्रमाणे लिहिणे बंधनकारक असेल.देवनागरी (मराठी): अहिल्यानगर
देवनागरी (हिंदी): अहिल्यानगर
रोमन (इंग्रजी): AHILYANAGAR
स्थानकाच्या कोडमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणेच ANG हाच कोड कायम राहणार आहे. अहमलनेर(बी) – अहिल्यानगर दरम्यानची रेल्वे सेवा सुरू असून, या मार्गावर प्रवास करणे नागरिकांसाठी सोयीस्कर ठरणार आहे.
दरम्यान, बीड – अहमलनेर(बी) या नवीन रेल्वेमार्गाचे उद्घाटन होणार असून, बीड – अहिल्यानगर दरम्यानची पहिली उद्घाटन विशेष गाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते १७ सप्टेंबर रोजी रवाना होणार आहे. या विभागात बीड, राजुरी(नवगण), राईमोहा, विघनवाडी, जतनंदूर व अहमलनेर(बी) अशी एकूण सहा स्थानके आहेत.
स्थानिक प्रवाशांनी व सर्वसामान्य नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे.